धक्कादायक : पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाकडून तिघांची हत्या....
धक्कादायक : पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाकडून तिघांची हत्या....
img
Dipali Ghadwaje
शिर्डी (भ्रमर वृत्तसेवा) :- शिर्डीजवळ सावळीविहीर गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. तर हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. 

कौटुंबिक वादातून  हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या  घटनेने शिर्डी हादरले आहे. शिर्डीजवळील सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी  सुरेश निकम  याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळींशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मध्यरात्री हे हत्याकांड घडले. रागाच्या भरात आरोपी सुरेश निकमने घरात घुसून वार केले. त्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी आहेत. जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


आरोपी सुरेश निकमला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पत्नीचे नाव वर्षा सुरेश निकम (वय 24), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25), आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 

मृत वर्षा सुरेश निकम यांची भावजई श्वेता गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अचानक आरोपी सुरेश निकम आले. दरवाजा उघडल्यानंतर लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group