१९ मे २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्टॉक मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने चार जणांची 58 लाख 33 हजार 924 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व त्यांचे इतर तीन साक्षीदार यांना अज्ञात इसमाने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले, तसेच फिर्यादी व इतर तीन जणांचे बनावट ट्रेडिंग अॅप तयार केले. त्यानंतर अज्ञात आरोपीने या चौघांनाही ट्रेडिंग अॅप तयार करून विविध खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले.
त्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीसह इतर तिघांनी आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर दि. 18 ऑक्टोबर 2023 ते दि. 24 एप्रिल 2024 या कालावधीत आरोपीने सांगितलेल्या वेळोवेळी 58 लाख 33 हजार 924 जमा केले; मात्र त्यानंतर गुंतवणूक केलेल्या रकमेवर जादा परतावा मिळाला नाही म्हणून ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar