नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता 26 जून रोजी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या जागेवर किशोर दराडे हे यापूर्वी आमदार होते. आता त्यांची मुदत संपत आल्याने हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. किशोर दराडे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. आता ते काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

यापूर्वी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता; परंतु शाळांना सुट्टी होती त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यामुळे हा कार्यक्रम आता नव्याने घोषित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये आता 31 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा तारीख ही 7 जून ठेवण्यात आली आहे. 10 जून रोजी छाननी 

तर 12 जून  ला माघारीसाठी शेवटचा दिवस असणार आहे. 26 जूनला सकाळी आठ ते चार या काळामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील शिक्षक वर्ग मतदान करणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group