महापारेषणच्या एकलहरे विद्युत उपकेंद्रातील नादुरुस्त एक पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलला
महापारेषणच्या एकलहरे विद्युत उपकेंद्रातील नादुरुस्त एक पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलला
img
दैनिक भ्रमर
नाशिक : महापारेषणच्या एकलहरे येथील  १३२×३३ विद्युत उपकेंद्रातील ५०x३ (१५० एमव्हीए) क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर  बिघाड झाल्याने या महापारेषणच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणारी नाशिक रोड भागातील महावितरणची उपकेंद्रे सोमवारी पहाटे  प्रभावित झाली होती.

पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मंगळवारी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर एकलहरे विद्युत उपकेंद्र येथे पोहचल्यानंतर महापारेषणचे अभियंते व कर्मचारी यांनी सातत्याने अथक परिश्रम घेत आज सायंकाळी ५० एमव्हीए क्षमतेचा सदर पॉवर  ट्रान्सफॉर्मर  बदलून सुरू केला  असून त्यामुळे महावितरणची  पंचक, एकलहरे, सामनगाव ही ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रे आणि आयएसपी व  सीएनपी या दोन्ही ३३ केव्ही विद्युत वाहिन्या  आज संध्याकाळी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या असून या तीन विद्युत उपकेंद्रातील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

एकलहरे येथील महापारेषणच्या या विद्युत उपकेंद्रातून महावितरणच्या पंचक, मुक्तिधाम, देवळाली, भगुर, एकलहरे व सामनगाव या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राना पुरवठा केल्या जातो. मात्र यामधील एक ट्रान्सफॉर्मर दिनांक ६ जून रोजी आणि उर्वरित २ ट्रान्सफॉर्मरमध्ये सोमवारी सकाळी एकाचवेळी झालेला  बिघाड ही अनपेक्षित घटना  असल्यामुळे एकलहरेच्या अति उच्च दाब उपकेंद्रातून मिळणारा वीजपुरवठा पर्यायी इतर महापारेषणच्या व महावितरणच्या उपकेंद्रातून बॅक फिडींग करून पुरवठा महावितरणकडून करण्यात आला. 

त्याचबरोबर या बाधित उपकेंद्रातील वीज भार पर्यायी स्त्रोतामधून मागणीनुसार    मागणीनुसार टप्याटप्याने वीज पुरवठा करीत चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले आहे.

महापारेषणमधील यंत्रणा  उर्वरित पावर ट्रान्सफॉर्मर पुन्हा सुरू करण्यासाठी  कार्यरत असून त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील  उर्वरित वीज ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा  मिळण्यास मदत होणार आहे तोपर्यंत ग्राहकांनी असेच  सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group