'या' जिल्ह्यात भाजपला भगदाड! माजी मंत्री शरद पवार गटाच्या वाटेवर? आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता
'या' जिल्ह्यात भाजपला भगदाड! माजी मंत्री शरद पवार गटाच्या वाटेवर? आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता
img
Dipali Ghadwaje
नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आज सुर्यकांता पाटील या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज मुंबई येथे सुर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी सुर्यकांता पाटील यांनी भाजपा पक्ष सस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. 

नांदेड जिल्ह्यात सुर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. मागील 10 वर्षांपासून सुर्यकांता पाटील ह्या भाजपामध्ये काम करीत होत्या. भाजपाने पाटील यांना कुठलेही जवाबदारी दिली नव्हती. त्यामुळेच सुर्यकांता पाटील ह्या भाजपा पक्षावर नाराज होत्या.

१० वर्षांनंतर स्वगृही परतणार? 

दरम्यान, सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कार्यरत होत्या. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री पदी संधी देण्यात दिली होती. परंतु 10 वर्षांपूर्वी भाजपाची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सूर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्या पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत येण्याची शक्यता आहे. सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group