धक्कादायक: पायाऐवजी डॉक्टरांनी केली गुप्तांगाची सर्जरी; वाचा कुठे घडली
धक्कादायक: पायाऐवजी डॉक्टरांनी केली गुप्तांगाची सर्जरी; वाचा कुठे घडली "ही" घटना
img
Jayshri Rajesh
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी एका ९ वर्षांच्या मुलावर चुकिची शस्त्रक्रीया केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुलाच्या पायाला जखम झाली होती. त्यावर शस्त्रक्रीया करण्याऐवजी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील रुग्णालयात हा प्रकार घडला असून याविरोधात मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुखणं पायाचं, ऑपरेशन गुप्तांगाचं

14 वर्षांच्या प्रीतम सुरेश पागे या मुलाच्या तळ पायाला जखम झाली होती, त्यामुळे प्रीतमचे आई-वडील त्याला उपचारासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर प्रीतमच्या पायाचे एक्स-रे काढण्यात आले. सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पायाचं ऑपरेशन करायला लागेल, असं सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रीतमच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली. प्रीतमचे ऑपरेशन करण्याअगोदर दोन लहान मुलांच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर प्रीतमला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्याच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया केली.

ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेरच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मुलगा बाहेर आल्यानंतर आईने त्याच्याकडे बघितलं असता त्याच्या पायचं ऑपरेशन केलं नसून गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना त्याच्या लघवीच्या जागेचं ऑपरेशन का केलं? असं विचारत प्रीतमच्या आईने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड केली.

डॉक्टरांच्या सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि जखम झालेल्या डाव्या तळपायाचं ऑपरेशन करण्यात आलं. पालकांच्या तक्रारीनतंर आरोग्य अधिकाऱ्यांनी  या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही संबंधितांवर योग्य ती वारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group