नाशिकमध्ये पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
नाशिकमध्ये पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आज सायंकाळी उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. 

केलेल्या बदल्यांमध्ये तृप्ती सोनवणे यांची बदली नाशिक रोड पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून, श्रीनिवास देशमुख यांची बदली भद्रकालीला दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून, सुभाष ढवळे यांची बदली नियंत्रण कक्षात, सुनील पवार यांच्याकडे अंबड पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे.

प्रवीण चव्हाण यांची बदली दुय्यम पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा येथे, सोहन माछरे यांची नियंत्रण कक्षात, नव्याने हजर झालेले जयंत शिरसाठ यांची दुय्यम पोलीस निरीक्षक उपनगर, कुंदन जाधव यांची दुय्यम निरीक्षक म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात, सुशील जुमडे यांची पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आलेली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये रामदास शेळके यांची बदली नियंत्रण कक्ष येथे, अशोक गिरी यांची बदली नाशिक रोड पोलीस ठाण्यात, दिलीप ठाकूर यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात, मुंबई नाका येथे संतोष नरोटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सचिन खैरनार यांची आडगाव पोलीस ठाणे येथे तर अतुल डहाके यांना म्हसरूळ पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आलेला आहे.

रणजित नलावडे यांची सातपूर पोलीस ठाण्यात, तर सुशीला कोल्हे यांची बदली अंमली पदार्थ विरोधी विभागामध्ये करण्यात आलेली असून विशेष शाखेचे प्रभारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

यासह 23 पोलीस कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरती पदोन्नती देण्यात आली असून त्यांचे देखील आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जारी करण्यात आलेले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group