उद्धव ठाकरेंचा भाजपाला दणका! विदर्भातील 'हा' बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
उद्धव ठाकरेंचा भाजपाला दणका! विदर्भातील 'हा' बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी सावर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी घडत असुन विदर्भामध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विदर्भातील भाजपचा एक बडा नेता शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. आता कुथे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार आहे. मात्र रमेश कुथे यांचा ठाकरे गटात प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश होणार आहे.

मेश कुथे यांनी २०२८ साली शिवसेना (ठाकरे गट) सोडली होती, आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.  १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर होते. तर २०१८ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक महायुतीतील नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group