बहुजन कल्याण विभागाने घेतला ''हा'' मोठा निर्णय
बहुजन कल्याण विभागाने घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
राज्याच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून, काही जातींचा भटक्या जमातींमतींध्ये समावेश करण्यास मान्यता दिल्याने या जातींना दिलासा मिळाला आहे. केवट-तागवाले, तागवाली, तागवाले, तागवाला या जातींचा तीं भटक्या जमातींमतीं ध्ये (ब) समावेश करण्यात आला आहे.

तसेच ,राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग यादीत अनुक्रमांक १८२ वरनमूद मायी, बागवान, राईन (बागवान) (मुस्लीमधर्मीय) यांच्यासमोर कुंजडा (मुस्लीमधर्मीय) या जातींचा तींसमावेश करण्यात आला आहे. तर इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक २६७ वर समाविष्ट असलेल्याचुनारी जातीसमोर चुनेवाला, चुनेवाले या जातींचा तीं भटक्या जमातींमतीं ध्ये समावेश करण्यात आला आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हडगर या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्ग यादीतीलअनुक्रमांक ३ (१) कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून करण्यात आला आहे. तसेच वंजारी या मुख्य जातीचीलाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड) अनुक्रमांक ३० मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्गातील अनुक्रमांक २२६ वरील भोयर जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात आली आहे. 

हा बदल शासन निर्णयाच्या दिवसापासून (६ ऑगस्ट) लागू करण्यात आला आहे.ठेलारी ही जात राज्य सरकारच्या भटक्या जमाती (ब) यादीतील क्रमांक २७ मधून वगळून भटक्या जमाती (क) यादीतील क्रमांक २९ मध्ये धनगर या जातीची तत्सम जात म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे.मागासलेपणाचा सखोल अभ्यास या संदर्भातील शिफारशी राज्य मागासवर्ग आयोगाने केल्या होत्या. त्यानंतर शिफारशींवरशीं मुख्यमंत्र्यांच्याअध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने विचार करून मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यतादिल्यानंतर मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला. मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी केल्या होत्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group