बँकेच्या अधिकारी महिलेचा खुर्चीवरून पडून जागीच मृत्यू, कामाच्या स्ट्रेसमुळे मृत्यू  झाल्याचा आरोप
बँकेच्या अधिकारी महिलेचा खुर्चीवरून पडून जागीच मृत्यू, कामाच्या स्ट्रेसमुळे मृत्यू झाल्याचा आरोप
img
दैनिक भ्रमर
 एका बँकेत  खुर्चीवरून पडून बँकेची अधिकारी म्हणून कार्यरत असलेली  सदफ फातिमा या महिलेचा  मृत्यू झाला. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. कामाच्या ताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. उत्तरप्रदेशमधून  ही धक्कादायक बातमी समोर आली आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वजीरगंज इथं राहणारी सदफ फातिमा एका  बँकेच्या गोमतीनगर इथल्या विभूतीखंड शाखेत एडिशनल डेप्युटी व्हॉइस प्रेसिडंट म्हणून कार्यरत होती. मंगळवारी दुपारी ३ वाजता ऑफिसमध्ये काम करत असताना ती बेशुद्ध होऊन खुर्चीतून पडली. आणि तिचा मृत्यू झाला . दरम्यान , तिच्या सहकाऱ्यांनी कामाच्या ताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान , ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, कामाचं खूप प्रेशर होतं. ती नेहमीच तणावात असायची. मंगळवारी कामाच्या वेळेतच ही घटना घडली. मात्र कर्मचाऱ्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मुंबईतून सगळं मॅनेज होत असल्याचंही कर्मचाऱ्यांनी म्हटलं.

विभूतीखंडच्या पोलिसांनी सांगितलं की, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनानंतरच समजू शकेल. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. एका नातेवाईकाने सांगितलं की, सदफ फातिमा गोळ्या खात होती. कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार दिलेली नाही किंवा आरोप केलेले नाहीत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group