आनंदाची बातमी : नाशिक विमानतळावरून एका दिवसात प्रथमच
आनंदाची बातमी : नाशिक विमानतळावरून एका दिवसात प्रथमच "इतक्या" प्रवाश्यांनी केला प्रवास
img
दैनिक भ्रमर

नाशिकच्या ओझर विमानतळावरून एका दिवसात प्रवास करणाऱ्यांची संख्या मंगळवारी (दि. २४) विमानतळ सुरू झाल्यापासून प्रथमच १३०६ झाली. यापैकी ६५२ प्रवासी नाशिकला उतरले तर ६५४ प्रवासी येथून रवाना झाले. 

सध्या इंडिगो कंपनीकडून हैदराबाद, इंदूर, गोवा, नागपूर, दिल्ली, बंगळूरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू असून तिचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांना होत आहे. यापूर्वी याच महिन्यात १४ सप्टेंबर रोजी १२३१ प्रवाशांनी नाशिक विमानतळावरून प्रवास केला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group