नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद व कार्यवाहपद बिनविरोध;
नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद व कार्यवाहपद बिनविरोध; "यांची" लागली वर्णी
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील सर्वात जुनी, शतक महोत्सवी वर्ष पूर्ण केलेली, नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके तर कार्यवाहपदी राजेंद्र निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बुधवार (२५) रोजी माघारी नंतर अध्यक्ष व कार्यवाह पदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रा. दिलीप फडके व माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख यांनी अर्ज भरले होते. रमेश देशमुख यांनी माघार घेतल्याने प्रा.दिलीप फडके यांची बिनविरोध निवड झाली आहे तर कार्यवाह पदासाठी विद्यमान कार्यवाह राजेंद्र निकम व सुनीता  मोगल यांनी अर्ज भरले होते.

सुनिता मोगल यांनी माघार घेतल्याने राजेंद्र निकम यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रा. दिलीप फडके यांनी २००५ पासून २०२३ पर्यंत सलग सहा वेळा उपाध्यक्ष म्हणून पद भूषवले आहे. यंदाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.तर चंद्रशेखर मोंढे यांची सलग चार वेळा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.राजेंद्र निकम यांनी सलग तीन वेळा निवडून येऊन कार्यवाहपदाची हॅट्रिक केली आहे.

 संस्थेच्या व नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी यापूर्वी ग.ज. म्हात्रे निवडून आले होते, त्याचप्रमाणे प्रा. फडके हे सध्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष असून संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.

प्रा. दिलीप फडके यांच्या नेतृत्वाखाली दोन उपाध्यक्ष व आठ कार्यकारी मंडळ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी चंद्रशेखर मोंढे व जयदीप वैशंपायन यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारी मंडळ सदस्य पदी मोहन रानडे, सचिन महाजन, राजा वर्टी,सरोजिनी तारापूरकर, रंजना परदेशी, मैथिली गोखले, देवदत्त जोशी, विश्वास बोडके यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक संघातून मधुकर पगारे, नंदा पेठकर,राजेंद्र कापसे, नंदिनी कहांडळ तर प्राथमिक मुख्याध्यापक संघातून कल्पना उदावंत व शिशुवृंद मुख्याध्यापक संघातून स्मिता वाळवेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उप मुख्याध्यापक संघातून शरद शेळके, रवींद्र हाते, फरहर शेख तर विविध शाळांच्या शिक्षक प्रतिनिधी पदी संगीता शुक्ल, उमेश कुलकर्णी, शैलेश पाटोळे, जुईली शेरीकर, अशोक शिरोडे, सूर्यभान जगताप, अर्चना भोसले, संजय आहेर, सुनंदा साळुंखे, रेणुका अरकडी यांची बिनविरोध निवड झाली असून शिक्षकेतर प्रतिनिधी पदी अमोल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेतून सुनंदा कुलकर्णी व विजय मापारी यांनी तसेच सीडीओ मेरी हायस्कूल मधून दिलीप अहिरे व पंढरीनाथ बिरारी यांनी शिक्षक प्रतिनिधी पदासाठी मात्र माघार न घेतल्याने ४ नोव्हेंबर रोजी  मतदान होईल. माघारी नंतर चित्र स्पष्ट झाले असले तरी निवडणुकीचा निकाल निवडणूक कार्यक्रमा प्रमाणे ४नोहेंबर रोजी निवडणूक निर्णय  अधिकारी जाहीर करतील.उत्तमराव (बाबा) गांगुर्डे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group