नाशिक-सापुतारा घाटात बस कोसळली; 5 प्रवासी ठार
नाशिक-सापुतारा घाटात बस कोसळली; 5 प्रवासी ठार
img
दैनिक भ्रमर

वणी-बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात आज पहाटे चार ते साडेचार वाजे दरम्यान महाराष्ट्र मधून गुजरात राज्यात जाणारी खासगी बस क्रमांक युपी ९२ एटी ०३६४ चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उलटली, यात पाच प्रवासी ठार झाले असून ४५ प्रवासी जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाली. यामध्ये रतनलाल देविराम जातव (वय ४१), बोलाराम पोसाराम कुसवा (वय ५५), गुहीबेन राजेशभाई यादव (वय ६०), बिजेंद्र बादल यादव (वय ५५), कमलेश भाई यादव (वय ६०, सर्व रा. मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे.

बसमधील 45 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group