नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नायलॉन मांजामध्ये अडकून मृत्यूशी झुंज देत असलेल्या जखमी पक्षांना वन विभागाने जीवदान दिले. संक्रांतीनंतर वन विभागाने नाशिक शहरातील विविध ठिकाणांहून अनेक पक्षी रेस्क्यू केले.
त्यातील काही पक्षी रोहिणी पंडित,अरुण अय्यर,वनपाल अनिल अहिरराव, उमेश नागरे, विलास शेवाळे, जावेद शेख, संजय कानडे आणि सचिन अहिरे यांच्या मदतीने अडकले होते.
नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेल्या पक्षांमध्ये घुबड, कोकीळ, भारद्वाज, शराटी पक्षी आणि घार यांचा समावेश आहे. यासर्व पक्ष्यांचे रेस्क्यू करून त्यांना टीटीसी म्हसरूळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.उपचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.
पक्ष्यांच्या वाचवणीसाठी आणि उपचारासाठी पुढील काळात कोणत्याही सहाय्याची आवश्यकता असल्यास संबंधित पक्षी बचाव संघटनांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रोहिणी पंडित यांच्या माध्यमातून म्हसरूळ येथून झाला होता पक्षी रेस्क्यू, अरुण अय्यर यांच्या माध्यमातून मोतीवाला कॉलेज, नासिक येथून गव्हाणी घुबड रेस्क्यू. अनिल अहिरराव वनपाल यांच्या माध्यमातून उंटवाडी, नासिक येथून कोकीळ, भारद्वाज आणि 2 शराटी पक्षी रेस्क्यू, उमेश नागरे यांच्या माध्यमातून सिडको, नासिक येथून भरद्वाज पक्षी रेस्क्यू.
विलास शेवाळे यांच्या माध्यमातून संभाजी स्टेडियम, नासिक येथून घुबड रेस्क्यू. जावेद शेख यांच्या माध्यमातून शिंगाडा तलाव, नासिक येथून घार पक्षी रेस्क्यू,संजय कानडे यांच्या माध्यमातून सावरकर नगर, गंगापूर रोड, नासिक येथून घुबड रेस्क्यू.सचिन अहिरे वनरक्षक यांच्या माध्यमातून सातपूर एमआयडीसी, नासिक येथून घार पक्षी रेस्क्यू.
सर्व पक्ष्यांना योग्य उपचार देऊन त्यांना प्रकृतीच्या दृष्टीने सुरक्षित ठेवले जाईल, व त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.