नाशिकरोडच्या हत्याकांड प्रकरणी घटनास्थळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली भेट
नाशिकरोडच्या हत्याकांड प्रकरणी घटनास्थळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली भेट
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : गंधर्व नगरी येथील एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात आठ वर्षे मूकबधिर असलेल्या ओम दुधाट याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केली गेली. रविवारी घडलेल्या या कृत्याने संपूर्ण शहरासह जिल्ह्यात खळबळ माजवली असून, प्रत्येक नागरिकाने या संतापदायक घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, जवळपास दहा संशयीतांची चौकशी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी लवकरच आरोपीला पकडले जाण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच युनिट दोनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 नागरिकांमध्ये असंतोष

या घटनेनंतर गंधर्व नगरी परिसरात तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून, नागरिकांनी दोषींना कठोर शासनाची मागणी केली आहे. अशा घटनेच्या पाश्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चांगलीच लढाई द्यावी लागणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group