पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतून धनंजय मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. माणिकराव कोकाटे हे नंदुरबारचे तर नरहरी झिरवाळ हे हिंगोली चे पालकमंत्री झाले आहेत.
अजित पवार हे आता पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.
गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.
संपूर्ण यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा
अटॅचमेंट पहा