नाशिकमध्ये चोरट्याने लांबावली माजी महापौरांच्या जावयाची कार
नाशिकमध्ये चोरट्याने लांबावली माजी महापौरांच्या जावयाची कार
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  माजी महापौरांच्या राहत्या घराजवळ जावयाने उभी केलेली टोयोटा फॉर्च्युनर चारचाकी गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मखमलाबाद नाका परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रवीण चंद्रकांत वाटमारे (रा. मु. पो. ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) यांनी त्यांचे सासरे तथा नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या राहत्या घराजवळ एमएच 30 बीबी 7077 या क्रमांकाची 30 लाख रुपये किमतीची टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर चारचाकी गाडी पार्क केली होती. ही गाडी दि. 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहिरे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group