नातेवाईकाने महिलेच्या मदतीने वृद्धास घातला 36 लाखांचा गंडा
नातेवाईकाने महिलेच्या मदतीने वृद्धास घातला 36 लाखांचा गंडा
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-  एकाने महिलेच्या मदतीने नातेवाईक असलेल्या वृद्धास 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी अरुण हरी शिंपी (वय 72) यांनी एक दिवस त्यांचे नातेवाईक असलेल्या हिरामण भामरे (रा. समर्थनगर, इंदिरानगर, नाशिक) यांच्यासोबत शिंपी यांच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणुक करावयाची असल्याबाबत सांगितले होते.

त्यावेळी हिरामण भामरे यांनी त्यांची ओळखीची एक महिला असून तिचे नाव अलका दिनेश गोरे (रा. बर्डेनगर, आडगाव नाका, नाशिक) असे सांगत ती ऑनलाईन गेम खेळते त्यामध्ये आपण १ लाख रुपये तिला गुंतवण्यासाठी दिले तर ती प्रति दिन १००० रुपये आपले मुद्दल परत करे पर्यंत देईल असे सांगितले. तसेव त्याने देखील तिच्याकडे पैसे गुंतविले असून त्याला त्याचा फायदा झाला झाल्याचे सांगून शिंपी यांचा विश्वास संपादन केला.

फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्या आठवडयात हिरामण भामरे हा अलका गोरे या महिलेला शिंपी घरी घेवून आला होता. त्यावेळी अलका गोरे या महिलेने गोड बोलून शिंपी यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर तिने प्रथम शिंपी यांना २ लाख रुपये गुंतविण्यास सांगितले.

हे पैसे ती ऑनलाईन गेम मध्ये लावेल आणि प्रति दिन २००० रुपये देईल असे सांगितले. हिरामण भामरे यांनी देखील त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितल्याने ते तयार झाले. त्यांनतर अलका गोरे व हिरामण भामरे यांना १२/०२/२०२४ रोजी २,००,००० रुपये रोख, २०/०२/२०२४ रोजी  १,००,००० रुपये रोख, २३/०३/२०२४ रोजी २,००,००० रुपये रोख, ४ मे २०२४ रोजी ५,००,००० रुपये रोख, 27/02/2024 रोजी आरटीजीएस द्वारे ५,००,००० रुपये, आरटीजीएस द्वारे 4/3/2024 रोजी 5 लाख रुपये, १८/०५/२०२४ रोजी आरटीजीएस द्वारे २०,००,००० रुपये असे एकुण 40 लाख रुपये रोख व आरटीजीएस द्वारे दिले. 

हे पैसे दिल्यानंतर साधारण एक महिनाभर प्रति दिन २००० रुपये कधी रोख स्वरूपात तर कधी ऑनलाईन आरटीजीएस ट्वारे अलका गोरे हिने परतावा म्हणून शिंपी यांना दिले होते. काही वेळेस हिरामण भामरे याने देखील त्यांना रोख स्वरूपात २००० रुपये दिले होते. त्यानंतर ती आणि हिरामण भामरे हे एप्रिल २०२४ मध्ये पुन्हा शिंपी यांना भेटले.

त्यावेळी अलका गोरे हिने शिंपी यांना पुन्हा १० लाख रुपये गुंतविण्यास सांगितले. तसेच त्याबाबत करार करू परंतू करारामध्ये आपण हे पैसे हे उसनवारीवर घेतले आहेत असे करारात दाखवायचे सांगितले. त्यास सुरुवातीला शिंपी यांनी नकार दिला. तेव्हा हिरामण भामरे आणि अलका गोरे यांनी गोड बोलून त्यांना तयार केले.

त्यांनी विश्वास ठेऊन आरटीजीएस व्दारे १० लाख रूपये अलका गोरे हिच्या खात्यावर पाठविले. तिने काही दिवस प्रतिदिन २५,००० रुपये दिले होते. त्यानंतर परत मे २०२४ मध्ये दोघांनी शिंपी यांच्याकडे रू. २० लाख गुंतविण्यासाठी तगादा लावला.

परत उसनवारी पैसे दिले बाबतचा करार करून २० लाख रुपये गुंतविण्यासाठी घेतले. शिंपी यांना पैसे मिळत असल्याने त्यांनी पुन्हा तिला आरटिजीएस व्दारे दिले होते. अशा प्रकारे विश्वास संपादन करून तीने माझेकडून वेळोवेळी रोख आणि आरटिजीएसव्दारे वर कॉलम मध्ये नमुद एकूण ४०,००,००० रुपये मी अलका गोरे हिला दिले.

त्याबदल्यात अलका गोरेने आतापर्यंत ४,००,००० रुपये परत दिलेले आहेत. उर्वरीत रक्कम त्यांना मागितली असता तिने शिंपी दाम्पत्याच्या नावे विविध बँकेचे काही चेक दिले होते. शिंपी यांनी तीन ते चार वेक बँकेत ते चेक वटविण्यासाठी टाकले असता ते कमी रक्कम असल्यामुळे वटले नाहीत.

दोघांनी संगनमताने शिंपी यांच्याशी गोड बोलून गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेतले व उर्वरित रक्कम न देता त्यांची 36 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group