नाशिक : पिझ्झा घेण्यासाठी आलेल्या दोघांना थांबावल्याचा राग आल्याने त्यांनी रेस्टॉरंटची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित सुरेश फड हा पिझ्झा घेण्यासाठी आज रात्री 8.30 वाजेच्या सुमारास म्हसरूळ परिसरातील डॉमिनोज पिझ्झा या रेस्टोरंट मध्ये गेले होते. आल्यावर त्यांनी आम्हाला पिझ्झा हवा आहे असे सांगितले.
त्यावर दादाजी मोहिते यांनी "गर्दी आहे, थोडे थांबावे लागेल" असे सांगितले. याचा राग येऊन सुरजने फिर्यादी दादाजी मोहिते यांना शिवीगाळ करत तोंडावर, हातावर, कानावर व नाकावर मारले तसेच काउंटरवरील कॉम्प्युटर फोडले.
याप्रकरणी मोहिते यांच्या फिर्यादीवरून सुरज व त्याच्या मित्राविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.