लासलगाव - लासलगाव-विंचूर रस्त्यावर भीषण अपघात झाला असून यात एकाचा मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.जखमींना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच रस्त्यावर या पूर्वी अपघात होऊन अनेक लोकांचा जीव गेला आहे.लासलगाव - विंचूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की
विंचुर - लासलगाव रोडवर हॅाटेल बळीराजा समोर एक दुचाकी व ह्युडांई वरना गाडीचा अपघात झाला. सदर अपघातात दुचाकी MH 15HR 4417 वरील चालक मच्छींद्र बाबुराव गांगुर्डे वय - 18 रा कोकणखेडे ता चांदवड हा मयत असुन त्याचे पाठामागील विजय शिवाजी सोनवणे वय -18 रा कोकणखेडे हा गंभीर जखमी व समोरील वरना गाडी क्रमांक MH 15 JH 2823 हीचे मालक राहुल बाळासाहेब दरेकर वय -35 रा मरळगोई ता निफाड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. दुचाकीवरील एक व कारमधील एक असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. लासलगाव - विंचूर या रस्त्यावर वाढत्या अपघाताच्या मालिका सुरु असल्यानं या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण व्हावे अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे