![नाशिकच्या](https://dainikbhramar.com/assets/uploads/news/a1mcjmfs.jpg)
११ फेब्रुवारी २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटाचे लोखंडी लॉकर तोडून त्यातील 23 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोकड असा एकूण पावणेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी युवराज वामन गडाख (रा. आडगाव शिवार, ता. जि. नाशिक) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील मास्टर बेडरूममध्ये जाऊन तेथे असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. त्यानंतर लॉकरमध्ये असलेली 36 हजार 240 रुपये किमतीची 24.160 ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टी, 30 ेहजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 7 हजार 500 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 4 हजार 770 रुपये किमतीचे 3.18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, 5 हजार 835 रुपये किमतीचे 3.89 ग्रॅम वजनाचे कानातील दागिने, 24 हजार 15 रुपये किमतीची 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 29 हजार 250 रुपये किमतीचा 19.50 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 6 हजार 900 रुपये किमतीची 4.5 ग्रॅम वजनाची कर्णफुले, 4 हजार 725 रुपये किमतीचे 3.150 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 18 हजार 660 रुपये किमतीचा 12.44 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 5 हजार 850 रुपये किमतीचे 3.90 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, 4 हजार 500 रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 15 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 4 हजार 500 रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल, 3 हजार 825 रुपये किमतीचा अडीच ग्रॅम वजनाचा पोहेहार, 30 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 30 हजार रुपये किमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 6 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, 45 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व अंगठी, 2 हजार 400 रुपये किमतीच्या 80 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील पट्ट्या, 3 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे, तसेच 44 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 64 हजार 520 रुपयांचा ऐवज घरफोडी करून लबाडीच्या इराद्याने चोरून नेला. हा प्रकार दि. 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान घडला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अहिरे करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar