ए सी एफ शिरीषकुमार सजन निर्भवणे (वय 54, सहाय्यक वनसंरक्षक उप वनसंरक्षक) व सुरेश कारभारी चौधरी (वय 44, वनपाल) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशो की, यातील तक्रारदार यांनी यातील साक्षीदार यांच्या शेतातील जांभळाचे व सादडाचे जुने वाळलेले झाडाचे लाकडाचा पिकअप क्र. Mh-04-as 8077 मध्ये भरून गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी फ़ॉरेस्ट खात्याचे ए सीएफ निरभवने तसेच वनपाल सुरेश चौधरी व कावेरी पाटील अशांनी 31/1/25 रोजी ही गाडी पकडून मेरी म्हसरूळ ह्या कार्यालयात गाडी घेऊन गेले होते. सदरची गाडी मालासह सोडण्यासाठी ए सी एफ नीरभवने यांनी वनपाल सुरेश चौधरी यांच्या मार्फतीने दोन हजार रु. दंड व लाच म्हणून 10,000 लाचेची मागणी केली.
यातील तक्रादार यांना लाच देण्याची अजिबात इच्छा नव्हती. तरी चौधरी हे दोन हजार रुपये दंड व दहा हजार रुपये रोख असे रंगे हाथ पंचांसमक्ष घेऊन श्री ए सी एफ नीरभवने यांना फोन करून दहा हजार रुपये माझ्याकडे मिळालेले आहेत असे कळविले असता, नीरभवने यांनी होकार देऊन, आता त्याची गाडीची ऑर्डर घायला पाठवून दे असे फोनवर बोलले.
दोघांविरुद्ध विरुध्द वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ, व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक एकनाथ पाटील, पोहवा सुनील पवार, पोना योगेश साळवे, चापोहवा विनोद पवार यांनी केली.