पती पत्नीचं नातं हे कधी गोड तर कधी आंबट असंच असत, कधी भांडण राग रुसवा तर कधी प्रेम. पण कधीकधी हे भांडण विकोपाला जाऊन काही पती पत्नीच्या नात्यात अक्षरशः विष निर्माण होत आंणि यातूनच अनर्थ घडण्यास वेळ लागत नाही. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एक पती बऱ्याच दिवसांपासून पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रत्येक वेळी त्याची पत्नी त्याची इच्छा नाकारत होती. पत्नीच्या नकारामुळे निराश झालेल्या पतीने एक दिवस असं पाऊल उचललं, ज्यामुळे केवळ त्याचे जीवनच नाही, तर त्याची पत्नी आणि मुलांचेही जीवन बदलून गेले. पतीच्या या कृत्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले.
ही घटना उत्तर-पूर्व दिल्लीतील गोकलपुरी भागातील आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख हर्ष गोयल म्हणून पटली आहे. गोकलपुरी पोलीस ठाण्याने या प्रकरणात हर्ष गोयलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (1) अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. खरं तर, हे प्रकरण 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास सुरू झाले, जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की एक तरुण महिला जोहरीपूर पोलीस स्टेशनजवळ रक्ताच्या अवस्थेत पडलेली आहे.
घटनेची माहिती मिळताच गोकलपुरी पोलीस स्टेशनचे एसएचओ प्रवीण कुमार टीमसह घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना समजले की, महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात पोहोचल्यावर पोलिसांना समजले की मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, मृताचा मोबाईल फोन आणि इतर सामानही गायब असल्याचे आढळून आले.
मृताची ओळख पटवण्यासाठी आणि खुनीचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर या २७ वर्षीय महिलेची ओळख पटली. सीसीटीव्ही फुटेज आणि तपासात समोर आलेल्या तथ्यांमुळे संशयाची सुई मृताच्या पतीकडे वळली. यानंतर पोलिसांनी आरोपी पती हर्ष गोयलला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. प्रथम, आरोपीने या प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचे नाकारले, परंतु नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी तो एनडीपीएस प्रकरणात तुरुंगात गेला होता. तुरुंगातून परत आल्यानंतर दोघांचेही प्रत्येक लहान गोष्टीवरून भांडण होऊ लागले. भांडणामुळे त्याची पत्नी घर सोडून गेली होती. तो वारंवार आपल्या पत्नीला घरी परत येण्यास सांगत होता, पण ती वारंवार नकार देत होती. आरोपीने सांगितले की, त्याला माहित होते की त्याची पत्नी दररोज मुलांना शाळेत सोडायला येते, त्यामुळे 17 फेब्रुवारीला तो शाळेबाहेर तिची वाट पाहू लागला.
मुले शाळेत गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, त्याला तिच्याशी बोलायचे आहे. यावेळी पत्नी बोलण्यास तयार झाली. पत्नीसोबत बोलता बोलता तो नाल्याजवळ आला. त्याने पत्नीला त्याच्यासोबत येण्यास सांगितले, तेव्हा तिने पुन्हा नकार दिला. नकारामुळे संतप्त झालेल्या या व्यक्तीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसला आणि तिचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी खुनात वापरलेला चाकू आणि फोन जप्त केला आहे.