नाशिकरोड (प्रतिनिधी ):- वैद्यकीय अधिकारी नाही, सोनोग्राफी मशीन बंद, प्रचंड अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, रुग्णाची हेळसांड, शौचालयातील तुटलेले भांडे, पिण्याच्या पाण्याचे हाल, लिफ्ट बंद, असे अनेक करणावरून बदनाम होत चालेल्या नवीन बिटको हॉस्पिटल मधील अति दक्षता विभागात चक्क देशी दारू च्या रिकाम्या बाटल्या अढळल्याने हॉस्पिटल ची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुका नाही. परिणामी मनपावर प्रशासक लागले आहे. उत्तर महारष्ट्रातील एकमेव अद्यवत व भव्य हॉस्पिटल म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, नवीन बिटको हॉस्पिटल ओळखले जाते. सिन्नर, इगतपुरी, नांदगाव, निफाड सह अनेक तालुक्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात.
कोविड काळात या हॉस्पिटलने शहरासह अनेक जिल्ह्यातील रुग्णाना जीवदान दिले. अनेकांच्या घरात आज गोकुळ नांदतो, तो केवळ या ठिकाणी असलेल्या कायम, तात्पुरते सेवेत असले डॉक्टर, नर्स, वार्डबॉय व इतर कर्मचारी मुळे. कोविड गेल्या नंतर कोणत्याही सुविधा नसलेल्या या ठिकाणी बाजूला असलेले जुने बिटको हॉस्पिटल स्थलांतर करण्याचा घाट घातला व नवीन जागेत सुरुही केले.
तीन मजले असलेल्या या हॉस्पिटल मध्ये अनेक ठिकाणी प्रकाश नसून अंधार आढळतो. येथे वैद्यकीय अधिकारी नाही, सोनोग्राफी मशीन बंद आहे, हॉस्पिटल मध्ये प्रचंड अस्वच्छता आहे, औषधांचा तुटवडा, त्यामुळे रुग्णाची हेळसांड होत आहे. अनेक वार्डमधील शौचालयातील फुटलेले भांडे आहे , पिण्याच्या पाण्याचे नाही. कायम एक दोन लिफ्ट बंद असतात, अश्या अनेक समस्यानी डोके वर काढले. मात्र हॉस्पिटल तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभाग या ठिकाणी देशी दारू च्या रिकाम्या बाटल्या आढळल्या ने अब्रूचे लष्करे वेशीवर टांगले गेले.
हॉस्पिटल मध्ये कायम व सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात असतात. वार्डबॉय असतात तरी देखील दारू च्या बाटल्या हॉस्पिटल मध्ये येतात कसे? असा प्रश्न उपस्थित करुन मनपा आयुक्त यांनी गंभीर दाखल घेऊन या ठिकाणी भेट द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक अंबादास पगारे यांनी केली आहे.
शिवसेना (उबाठा)चे उपमहानगर प्रमुख सागर भोजने यांनी संताप व्यक्त करीत सांगितले की, या ठिकाणी गोर गरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. कोविड काळात या हॉस्पिटल ची खूप मदत झाली. जुने हॉस्पिटल येथे स्थलांतर करुन प्रशासनाने काय साध्य केले. हॉस्पिटल मध्ये समस्यांचा डोंगर असतांना आत्ता देशी दारूच्या बाटल्या हॉस्पिटल मध्ये सापडल्याने रुग्णालय प्रशासन झोपा काढते काय?
दोन वर्षापासून मनपा निवडणुका नसल्याने लोकप्रतिनिधी नाही,त्यामुळे त्याच्या वर कोणाचा अंकुश नसल्याने आत्ता चक्क दारू च्या बाटल्या सापडल्या. मनपा आयुक्त यांनी यांची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यावी, सुरक्षा रक्षक बदलावे अन्यथा शिवसेना (उबाठा) च्या वतीने जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.