शिंदेगाव एमआयडीसी मधील दोन कंपन्यांना भीषण आग
शिंदेगाव एमआयडीसी मधील दोन कंपन्यांना भीषण आग
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या शिंदेगाव नायगाव रोड एम आय डी सी मधील दोन कंपन्यांना भीषण आग लागली. अगीचे लोट दूर पर्यंत दिसून येत होते.काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
           
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदेगाव-नायगाव रोड वरील एम आय डी सी मधील युनिले कोटिंग प्रायव्हट लिमिटेड या रंग बनविण्याच्या कारखान्याला सायंकाळी सुमारास भीषण आग लागली. अगीचे लोट दूर पर्यंत दिसून येत होते. रंग बनविण्याचा कारखाना असल्याने मोठमोठे स्फोट होत आकाशात दूर पर्यंत रंगाचे डब्बे उडत होते.

यात काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आग सर्वत्र पसरल्याने या कंपनीच्या लगत असलेल्या बारदान तयार होत असलेल्या कंपनी ला आगीने घेरले. नाशिकरोड अग्निशमक दलाच्या दोन तर नाशिक मधून तीन बंब घटनास्थळी पोहचले आहे. भीषण आग असल्याने आग आटोक्यात येणे जिकरीचे झाले आहे.
नाशिकरोड पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group