देवळाली कॅम्पला 17 मजली इमारतीचे बांधकाम थांबविले;
देवळाली कॅम्पला 17 मजली इमारतीचे बांधकाम थांबविले; "हे" कारण आले समोर
img
दैनिक भ्रमर

नाशिकरोड (प्रतिनिधी) :- लॅमरोड परिसरातील सौभाग्यनगर येथे हद्दीच्या वादावरून अष्टपाद हाईट्‌‍स या बांधकाम प्रकल्पावर कॅन्टोन्मेंट बोर्डाने हरकत घेत बांधकाम थांबण्याची कारवाई केली आहे. मात्र बांधकाम प्रकल्प व्यावसायिकाच्या दाव्यानूसार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला येथे बांधकाम थांबविण्यास व आपला फलक लावण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे सांगितले. 

 देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड व नाशिक महापालिकेच्या हद्दीवर असणाऱ्या 21 बी /7 या जागेवर बांधकाम प्रकल्प व्यावसायिक विजय छेडा यांनी नाशिक महानगरपालिकेच्या परवानगीने गेल्या दोन-तीन वर्षांपासून 17 मजली इमारतीचे काम सुरु केले आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने संबधित जागा ही कॅन्टोन्मेंट हद्दीत असल्याचे कारण देत काल सहाय्यक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता ऐश्वर्या पी.व्ही., पियुष पाटील, अनधिकृत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भुनेश नेरकर, वसंत शेरमाळे, वासू पगारे आदींसह कर्मचाऱ्यांनी संबंधित बांधकाम प्रकल्पावर जात येथे सुरु असलेले काम थांबवित मोजमाप केले तर बांधकामासाठी वापरात येणारे विविध प्रकारचे साहित्य जप्त केले असल्याची माहिती देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बांधकम विभागाच्या वतीने देण्यात आली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group