नाशिकरोड प्रतिनिधी : मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्का रोड, देवळाली गांव, नाशिकरोड या परिसरातील नागरिकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांच्या घरांवर रात्री बेरात्री सर्रासपणे गेली ८ ते १० दिवसांपासून काही अज्ञात टवाळखोर समाज कंटका कडून परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चुकीच्या पध्दतीने मोठ मोठाले दगड विटा फेकले जात आहे, व तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घराचे सिमेंटी पत्रे, कौलाचे नुकसान झाले आहेत.
जर कधी दगड हा नागरीक व लहान मुले घरात झोपलेले असेल. तर मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित आमचे निवेदनाची दखल घ्यावी अशी मागणी करीत सह्यांचे पत्र सोबत जोडलेले आहे, यावेळी ज्योती निरभवणे, जिजाबाई ठोंबरे, ताराबाई चंद्रमोरे, बाळू कटारे, सुनिता भालेराव, विद्या आहिरे, लता अहिरे, वनिता तेलोरे,अश्विनी निकम, दिपमाला पगारे, अर्चना नायर, सुनिता आहिरे, संगिता कांबळे, सिद्धार्थ कांबळे, संतोष नोटीयाल, लता जागपता, लिलाबाई तेलोरे, सुमनबाई चंद्रमोरे, रेष्मा तेलोरे, प्रेरणा जाधव आदि मालधक्का परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते..