अद्वय हिरे यांना
अद्वय हिरे यांना "इतके" दिवस पोलीस कोठडी
img
दैनिक भ्रमर
शिवसेना उबाठा गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना काल पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतले. त्यांना आज मालेगाव न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. रेणुका सहकारी सूतगिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने काल भोपाळ येथून अटक करून रात्री उशिरा त्यांना मालेगाव येथे आणण्यात आले.

पोलिस ठाण्याच्या व न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. हिरेंच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते. यावेळी न्यायालयात इतरांना प्रवेशबंदी केली होती. ऐन दिवाळीत हिरेंना अटक झाल्यानंतर हिरे समर्थक आक्रमक झाले. काल रात्री (ता.१५) ला रात्री उशिरा न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील गर्दी झाली होती.

परंतू रात्री न्यायालयात हजर न करता आज सकाळी न्यायालयात हजर करताच हिरे समर्थकांनी घोषणाबाजी केली, दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group