अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील किती जण दगावले? वाचा संपूर्ण यादी
अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील किती जण दगावले? वाचा संपूर्ण यादी
img
Dipali Ghadwaje
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश आहे. ४ क्रू मेंबर्स, पायलट आणि ८ प्रवशांचा मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त विमानाने गुरुवारी दुपारी १.३८ मिनिटांनी लंडनसाठी अहमदाबादमधून उड्डाण घेतलं, पण हाकेच्या अंतरावर गेल्यानंतर ७०० फुटावरून डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं.

या दुर्घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं, त्या ठिकाणी २४ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शिकावू डॉक्टरांचाही समावेश आहे.

अहदमबाद येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश आहे. त्याची यादी समोर आली आहे. 

अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच मेघानी नगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश आहे.

मृतांमध्ये मैथिली पाटील, अपर्णा महाडिक, रोशनी सोनघरे, दीपक पाठक आणि इतर क्रू मेंबर्सचा समावेश आहे. मृतांमध्ये विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल आणि काही क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. कॅप्टन सुमीत सभरवाल हे मुंबईतील पवई येथील जल वायु विहार येथे राहत होते.

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील मृत व्यक्तींची सर्व यादी -

सुमीत सभरवाल, (पायलट) पवई

दीपक पाठक, (क्रू मेंबर) बदलापूर

मैथिली पाटील (क्रू मेंबर) , पनवेल

रोशनी सनघरे (क्रू मेंबर), डोंबिवली

अपर्णा महाडिक (क्रू मेंबर), गोरेगाव

साईनीता, जुहू

अशा पवार, सांगोला

महादेव पवार, सांगोला

यशा कामदार-मोढा, नागपूर

रूद्र कामदार , नागपूर

रक्षा कामदार , नागपूर

समीर शेख, पिंपरी

श्रद्धा धवन, मुलूंड
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group