नाशिक : अल्पवयीन मुलीचा बापाकडून दुसर्‍यांदा विनयभंग
नाशिक : अल्पवयीन मुलीचा बापाकडून दुसर्‍यांदा विनयभंग
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्वत:च्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुसर्‍यांदा विनयभंग करणार्‍या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही वडाळा गाव परिसरात राहते. फिर्यादीची 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी काल (दि. 24) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरी होती. त्यावेळी या मुलीच्या बापाने मुलीला जवळ बोलावून तिच्याशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.

यापूर्वीही या मुलीचा बापाने विनयभंग केला होता. काल (दि. 24) पुन्हा त्याने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group