आखाती युद्धाच्या नावाखाली गॅसचा काळाबाजार! ठाणे शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; 'गौरव स्वीट्स'वर पडली धाड
आखाती युद्धाच्या नावाखाली गॅसचा काळाबाजार! ठाणे शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; 'गौरव स्वीट्स'वर पडली धाड
img
दैनिक भ्रमर


देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर टूटवडा भासत आहे. यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरवर निर्बंध लादण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे परिमंडळ विभागाने भरारी पथकाने छापा टाकून कासारवडवली परिसरात बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला.

या कारवाईत ८८ हजार किंमतीचे १७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. आखाती देशात युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होऊन गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक गॅस सिलिंडर धारकांना बसला. व्यावसायिक गॅस सिलिंडर खरेदीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेक व्यावसायिकांवर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली.

तर, बेकायदेशीररित्या गॅस सिलिंडर चा साठा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अशातच उपनियंत्रक शिधावाटप, ठाणे परिमंडळ कार्यालयाचे प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे (कार्यालय क्र. ४१ ठाणे), तसेच महेश कुसमुडे, भगवान खंडेराव, मनीष शास्त्री, गणेश हरणे, भूषण देशपांडे, निलेश देसाई आणि धीरज शिंदे आदींनी कारवाई केली.सोमवारी भरारी पथकाने कासारवडवली येथील ‘गौरव स्वीट अँड नमकीन’ या ठिकाणी धाड टाकली.

या कारवाईत मोठ्या प्रमाणात गॅस साठा बेकायदेशीररीत्या ठेवल्याचा आढळून आला. या छाप्यामध्ये एचपीसीएल कंपनीचे ४७.५ किलो वजनाचे ०५ भरलेले आणि ०१ रिकामा सिलिंडर तसेच बीपीसीएल कंपनीचे १९ किलो वजनाचा ०१ भरलेला आणि १० रिकामे सिलिंडर असे एकूण १७ सिलेंडर जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ८८ हजार १०१ इतकी असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन कासारवडवली पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, एलपीजी ऑर्डर २००० आणि विस्फोटक परवाना अधिनियम १९३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group