शहरातील 53 पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपालट
शहरातील 53 पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपालट
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून या अनुषंगाने नाशिक आयुक्तालयातील 53 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अध्यादेशातील तरतुदीनुसार सर्वसाधारण बदली स्थापना मंडळाच्या आदेश व प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्थेची निकड लक्षात घेऊन काल रात्री उशिरा दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक आणि 26 सहाय्यक  पोलीस निरीक्षक अशा 53 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे  आदेश दिले आहेत.

सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या 
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांची नाशिकरोड विभागात तर अंबादास भुसारे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन म्हणून बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या- नाशिक शहर वाहतूक शाखेचे सोहन माछरे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रवीण चव्हाण यांची आडगाव पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळे यांची उपनगर पोलीस ठाणे, वाहतूक शाखेचे सुभाष ढवळे यांची म्हसरूळ पोलीस ठाणे, शहर गुन्हे शाखेचे रणजीत नलवडे यांची सातपूर पोलीस ठाणे, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या तृप्ती सोनवणे  यांची गंगापूर पोलीस ठाणे,

सरकारवाडा पोलीस ठाण्याचे दिलीप ठाकूर यांची अंबड पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक शरमाळे यांची इंदिरानगर पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे यांची  गुन्हे शाखा युनिट 2, अंबड पोलीस ठाण्याचे प्रमोद वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखा, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे नितीन पगार यांची आर्थिक गुन्हे शाखा, सातपूर पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांची  आर्थिक गुन्हे शाखा, गंगापूर पोलीस ठाण्याचे श्रीकांत निंबाळकर यांची विशेष शाखा, आडगाव पोलीस ठाण्याचे गणेश न्याहदे यांची विशेष शाखा,  आर्थिक गुन्हा शाखेचे सुरेश आव्हाड यांची सरकारवाडा पोलीस ठाणे,  

विशेष शाखेच्या सुरेखा पाटील यांची सरकारवाडा पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे संजय पिसे यांची भद्रकाली पोलीस ठाणे, महिला सुरक्षा विभागाच्या ज्योती आमणे यांची पंचवटी पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेचे राकेश हांडे यांची शहर वाहतूक शाखा युनिट 1, अंमली विरोधी पथकाचे दिवाण वसावे यांची शहर वाहतूक शाखा युनिट 2, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पवन चौधरी यांची शहर वाहतूक शाखा युनिट 2, विशेष शाखेचे महेंद्र चव्हाण यांची बीडीडीएस, खंडणी विरोधी पथकाचे विद्यासागर श्रीमणवार यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, वाचक शाखेचे प्रकाश पवार यांची नियंत्रण कक्ष, पीसीबी-एमओबीचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखेत बदली करण्यात आली आहे.

 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या...
आडगाव पोलीस ठाण्याचे संतोष शिंदे यांची विशेष शाखा, पंचवटी पोलीस ठाण्याचे दिनेश खैरनार यांची शहर वाहतूक शाखा, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे विनायक आहिरे यांची आर्थिक गुन्हे शाखा, भद्रकाली पोलीस ठाण्याचे किशोर खांडवी यांची शहर वाहतूक शाखा, भद्रकाली पोलीस ठाण्याचे संजय बिडगर यांची पोलीस कल्याण/ प्रशिक्षण शाखा, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे विष्णू भोये यांची नियंत्रण कक्ष, अंबड पोलीस ठाण्याचे साजिद मन्सुरी यांची गुन्हे शाखा, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे शंकरसिंग राजपूत यांची गुन्हे शाखा, अंबड पोलीस ठाण्याचे वसंत खतेले यांची गुन्हे शाखा, अंबड पोलीस ठाण्याच्या प्रमिला कावळे यांची गुन्हे शाखा, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रकाश गिते यांची नियंत्रण कक्ष, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अनिल जगताप यांची शहर वाहतूक शाखा,

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हेमंत फड यांची गुन्हे शाखा, पंचवटी पोलीस ठाण्याच्या सुवर्णा हांडोरे यांची सायबर पोलीस ठाणे, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या छाया देवरे यांची आर्थिक गुन्हे शाखा, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सुधीर पाटील यांची मुंबई नाका पोलीस ठाणे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे शिवाजी अहिरे यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाण्याचे नितीन पवार यांची मुंबई नाका पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाण्याचे नरेंद्र बैसाणेयांची उपनगर पोलीस ठाणे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सोमनाथ गेंगजे यांची गंगापूर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निखिल बोंडे यांची आडगाव पोलीस ठाणे,

शहर वाहतूक शाखेचे यतीन पाटील यांची अंबड पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे किरण रौंदळ यांची अंबड पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे प्रवीण सूर्यवंशी यांची नाशिकरोड पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे  शाखेच्या उमा गवळी यांची भद्रकाली पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे किशोर कोल्हे यांची पंचवटी पोलीस ठाणे  याप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group