नाशिकरोड (प्रतिनिधी):-गेल्या तीस वर्षा नंतर शिवसेनेच्या नाशिक मध्ये होणाऱ्या अधिवेशन, सभा याकडे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पाठ फिरवली आहे.त्यामुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे.
शिर्डी मध्ये भाऊसाहेब वाघचैरे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्या नंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. मुबंई मध्ये चर्मकार समाजाचा मेळावा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्या मुळे घोलप काय निर्णय घेतील? या कडे सर्वांचे लक्ष लागून होते.
आत्ता गेल्या तीस वर्षानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेचे अधिवेशन आणि सभा होत आहे. त्या स्पर्शभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक मध्ये आगमन झाल्याबरोबर घोलप यांच्या देवळाली मतदार संघातील स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या भगूर येथील जन्मस्थळा भेट देऊन त्यांना अभिवादन केले. विशेष म्हणजे घोलप यांच्या दारावरून ठाकरे गेले मात्र बबनराव घोलप यांनी या कडे पाठ फिरवली.
याबाबत माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यानी सांगितले कि, डोळ्याचे ऑपरेशन झाले असून डॉकटर यांनी बाहेर फिरण्यास मनाई केली असल्याने जाऊ शकलो नाही. मुलगा माजी आमदार योगेश घोलप मात्र या अधिवेशन, सभा यांच्या नियोजना सह सर्व प्रक्रियेत सहभागी आहे.