आगे आगे देखो होता है क्या! अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं  मोठं वक्तव्य
आगे आगे देखो होता है क्या! अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा हा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक  सूचक विधान केले आहे. 

काय म्हणाले फडणवीस?

काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे, त्यातील जनतेशी संपर्क असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमध्ये गुदमर होतेय. देशभरात हाच ट्रेंड आहे. जनतेचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे काही मोठे नेते भाजपात येतील हा विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढच सांगेन आगे, आगे देखिये होता हैं क्या…असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलत असताना सूचक वक्तव्य केले आहे. 

दरम्यान, विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप मुख्यालयात फडणवीसांची पत्रकार परिषद झाली. तर काही माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळीच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होईल अशा चर्चांना जोर धरला मात्र आज त्यांचा प्रवेश झाला नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group