इंदिरानगरला स्पा सेंटरवर धाड, सहा जणांना अटक
इंदिरानगरला स्पा सेंटरवर धाड, सहा जणांना अटक
img
DB
 नाशिक (प्रतिनिधी) :- इंदिरानगर परिसरात एका इमारतीत बेकायदेशीरपणे स्पा सेंटर चालविणाऱ्या सहा जणांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, देह विक्री करणाऱ्या दोघा महिलांची सुटका केली आहे.

अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे व उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्मा हिल ईस्ट बिल्डिंग, पाथर्डी रोड, इंदिरानगर येथे छापा टाकला.

बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली असता यावेळी स्पा सेंटरच्या नावाखाली दोघा महिलांकडून वेश्या व्यवसाय करण्यात येत असल्याचे दिसून आले. यावेळी स्पा सेंटर चालविणारे आयेशा आजिम कादरी (वय 38, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा), शुभम्‌‍ चव्हाण व त्यांचे मदतनीस विजयकुमार नायर (वय 43, रा. श्री आर्केड, दामोदरनगर), सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी (वय 34, रा. काझी मंजिल, सुखदेवनगर, पाथर्डी गाव), अजय बबलू चव्हाण (वय 33, रा. वेदांत पार्क रो-हाऊस, दामोदरनगर) व रवी कोंडाजी मुठाळ (वय 27, रा. बाजगिरा फाटा, लहवित) या सर्वांना ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी इंदिरानगरचे पोलीस नाईक सागर परदेशी यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद नोंदविली असून, आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम 370 व 34 सह 3, 4, 5 अन्वये कळवण येथील देह व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रमाणे पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे हे करीत आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ-2 च्या उपायुक्त मोनिका राऊत, अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक संदीप पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक बारेला, हवालदार जावेद खान, कॉन्स्टेबल मुश्रीफ शेख, चंद्रभान पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल धनवंता राऊत, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group