लोकल ट्रेनमध्ये मुलीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न ; प्रवाशांनी आरोपीला चांगलंच धूतलं
लोकल ट्रेनमध्ये मुलीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न ; प्रवाशांनी आरोपीला चांगलंच धूतलं
img
दैनिक भ्रमर
मुंबई लोकलमध्ये १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक घटना उघडकीस आला आहे. लोकल ट्रेनमधील प्रवाशांना हा प्रकार लक्षात येताच त्यांना आरोपीची चांगलीच धुलाई केली आहे. प्रवाशांच्या मारहाणीत आरोपी जखमी झाला होता. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. अहमद नूर असे आरोपीचे नाव असून तो कामाठीरपुरा भागातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी (३० मार्च) रोजी दादर ते अंधेरी या स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. पीडित मुलगी आपल्या वडिलांसोबत रुग्णालयातून परत येत होती. साधारण ती आणि तिचे वडील रात्री ८.३० च्या सुमारास दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनच्या जनरल डब्यात चढले. काही वेळानंतर मुलगी आणि तिचे वडिल एकमेकांच्या विरुद्ध बाजूला बसले होते. आरोपी नूर येऊन मुलीच्या शेजारी बसला आणि लोकलमध्ये गर्दी असल्याने याचा फायद घेत आरोपी नूर अहमदने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर नूरने मुलीसमोर उभे राहून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

वडिलांना याबाबत समजताच नूर अहमदला धावत्या ट्रेनमध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार इतर प्रवाशांना समजताच प्रवाशांनीही नूरला चोप दिला.मुलीच्या वडिलांनी तसेच इतर प्रवाशांनी आरोपी नूर अहमदला अंधेरी स्थानकात उतरवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. प्रवाशांच्या मारहाणीत नूर जखमी झाल्याने त्याला आधी जवळील रुग्णालयात दाखल केले. यापूर्वीही नूरला अशा गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. नूर अहमद अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. नूर अहमदला सोमवारी रुग्णालयात सोडण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group