प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले , २०१४ पासूनच शरद पवारांचे.....
प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले , २०१४ पासूनच शरद पवारांचे.....
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत पुन्हा एक मोठा दावा केला. “अजित पवार आणि सहकाऱ्यांनी २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या दाव्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यावर भाष्य करताना मोठे विधान केले आहे.

२०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरु होते मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, प्रफुल्ल पटेल नेमके काय बोलले हे ऐकले नाही. मात्र, शरद पवारांनी आधीही भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केलेला. २०१४ च्या निवडणुकीत शरद पवारांनी तसा प्रयत्न केला होता. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपात बिनसले. भाजपाचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळे चालले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group