आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीला कोणी मारतं का? नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीला कोणी मारतं का? नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. काल आंबवडे येथे सुप्रिया सुळे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. मात्र माझ्याविरोधात देण्यासाठी त्यांच्याकडे एकही उमेदवार नाही. म्हणूनच आमचा पक्ष फोडला. घरातीलच उमेदवार दिला.आज रोज शरद पवारांविरोधात बोलतात. पण बघा, आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात, बाभळी ला कोणी मारतं का?" असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

"रोज पवार साहेबांवर बोलतात. पण टीका करायची असेल तर कामांवर करा. कामांवर बोलायला त्यांना काहीच नाही. आम्हाला भ्रष्टाचारी आहेत म्हणालेले. काय झालं त्या भ्रष्टाचाराचं.आम्ही कधीही भ्रष्टाचारं केला नाही. गरीब माणसांचे पैसे घेऊन आम्ही महाले नाही बांधली. गरीबांच्या सुख, दुःखात राहिलो," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group