फोटो व्हायरल करण्याची  धमकी देऊन लैंगिक अत्याचार, 13 वर्षीय मुलगी राहिली गर्भवती
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार, 13 वर्षीय मुलगी राहिली गर्भवती
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 13 वर्षीय अल्पवयीन युवतीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित मुलगी ही तिच्या आजीकडे नेहमी यायची. तेव्हा तिची ओळख आरोपी इसमाशी झाली होती. तसेच तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो कॉपी करून ते स्वत:च्या फोटोसोबत जोडून तो फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.

त्यानंतर पीडित तरुणीला संक्रांतीच्या दिवशी एका घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यातून ही पीडित तरुणी गर्भवती झाली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी इसमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रायकर करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group