सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला चार दिवसांची पोलीस कोठडी
सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला चार दिवसांची पोलीस कोठडी
img
Dipali Ghadwaje
कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी असणार आहे. 

कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायलाही अटक करण्यात आलेय. त्यांनी ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टानं तावरे आणि हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं होते. ड्रायव्हरचं अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, अन तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते, विशाल अग्रवालला याप्रकरणी आज अटक करण्यात आली आहे  आहे. 

कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group