मोठी बातमी : खासदार निलेश लंकेच्या स्विय सहाय्यकावर प्राणघातक हल्ला
मोठी बातमी : खासदार निलेश लंकेच्या स्विय सहाय्यकावर प्राणघातक हल्ला
img
Dipali Ghadwaje
अहमदनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामध्ये निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहीतीनुसार , या हल्ल्यात राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये झावरे किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकसभेची आकडेवारी समोर आली आहे. विखेंची सत्ता असलेल्या अहमदनरगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके विजयी झाले आहेत. या मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत झाली. यामध्ये लंकेनी मोठा विजय मिळवला आहे.

  • निलेश लंके- ६,२४,७९७
  • सुजय विखे- ५,९५,८६८
विजयी उमेदवाराचे मताधिक्य - २८,९२९

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group