वैतरणा धरणात एक जण  बुडाला; एकाला वाचविण्यात यश
वैतरणा धरणात एक जण बुडाला; एकाला वाचविण्यात यश
img
Chandrakant Barve
नाशिकरोड  (चंद्रकांत बर्वे) :- काल रविवारी सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी वैतरणा धरणावर गेलेल्या नाशिकरोड - जेलरोड भागातील पाच मित्रांपैकी दोन जण दगडावर उभे राहून फोटो काढत होते, मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात दोघे जण वाहून जाऊ लागले, प्रसंगावधानाने एकाच जीव वाचविण्यात यश आले असून दुसऱ्याचे मात्र या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  वाचलेला मित्र हा उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आहे.

लोणावळा येथील भुशी धरणात जण एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याच्या घटनेने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत असताना काल अशीच घटना वैतरणा धरणात घडली. उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहुल जाधव (रा. जेलरोड ) अनंत पोपटराव गोतीसे (रा. जयंतनगर, जेलरोड ) राहूल गीते (रा. प्रगतीनगर ), केशव मरकड, सचिन बोरसे,  असे सर्व 5 मित्र काल दुपारी पर्यटनासाठी इगतपुरी घोटी परिसरात गेले होते.

त्यासाठी त्यांनी आधी अशोका वॉटर फॉल येथे जाण्याची नियोजन केले, मात्र तो बंद असल्यामुळे त्यांनी वैतरणा धरणावर जाण्याचा निर्णय घेतला. पर्यटनाचा आनंद घेत असताना राहुल जाधव व अनंत गोतीसे हे धरणाच्या पाण्याच्या मधोमध जाऊन एका दगडावर उभे राहून फोटो काढत होते.

मात्र त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दोघेजण अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून जाऊ लागले. तेव्हा राहुल गिते याने प्रसंगावधान राखत आपल्या दोन्ही मित्रांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात राहुल जाधव याला गीते यांनी पाण्यातून बाहेर काढले, मात्र अनंत गोतीसे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलीस कर्मचारी राहुल जाधव यांच्यावर मुबंई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे .अनंत गोतीसे हा दिगंबरनगर, जेल रोड, पंचक येथील महापालिकेच्या महिला जिम मध्ये प्रशिक्षण देत होता. एक वर्षापासून येथे प्रशिक्षण देत असताना त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.या घटनेबद्दल नाशिकरोड - जेल रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group