खुशखबर...राज्यात मेगा नोकरभरती; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
खुशखबर...राज्यात मेगा नोकरभरती; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
img
Jayshri Rajesh
राज्य सरकारद्वारे तब्बल 1 लाख 8 हजार नोकर भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 57 हजार 452 अर्जदारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर येत्या महिन्याभरात 19 हजार 853 अर्जदारांना नियुक्ती पत्र दिली जातील, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे महाराष्ट्रात मेगाभरती सुरु असल्याचे बोललं जात आहे.

महाराष्ट्रात नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट 2022 पासून आम्ही पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारकडून 75 हजार नवीन पद भरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. आम्ही ही भरती सुरु केली. याबद्दल परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने या परीक्षा पार पडल्या. अमरावतीत घडलेली घटना सोडली आणि तलाठी परीक्षेत पेपर चुकला, तो परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला, या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा पूर्ण झाली. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात आमच्या शासनाने एक अतिशय चांगला रेकॉर्ड तयार केला असल्याचे देवेंद्र फडणवीसानी सांगितले. 

ऑगस्ट 2022 नंतर 57 हजार 452 तरुणांना नियुक्तीपत्र दिले. या असून ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना या महिन्याभरात नियुक्तीपत्र दिले जाईल, ही संख्या 19 हजार 853 इतकी आहे. आम्ही 75 हजार भरतीची घोषणा केली होती, त्याऐवजी आम्ही 77 हजार 305 लोकांना सरकारी नोकरी दिली आहे.तसेच याबद्दलची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याबद्दलचे नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे. तर काहींना दिले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group