विधानसभा निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु; रविकांत तुपकरांची मोठी राजकीय घोषणा !
विधानसभा निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु; रविकांत तुपकरांची मोठी राजकीय घोषणा !
img
Jayshri Rajesh
शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. तुपकर यांनी राजकीय दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभेच्या जागांवरती उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भात येत्या 13 जुलै रोजी पुण्यामध्ये राज्यस्तरीय बैठक आयोजित करून पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती तुपकर यांनी दिली. 

बुलढाणा लोकसभेमध्ये आमचा काही फरकाने पराभव झाला. आता आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार देऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे सहा उमेदवार आम्ही उभे करणार आहोत.12,13 जुलैला पुण्यामध्ये कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोणकोणत्या भागात निवडणुका लढवायच्या याबाबत निर्णय घेणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.  

2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिंदे गटाचे  खासदार प्रतापराव पवार यांच्या विरोधात तुपकर यांनी निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेतलं होतं. आता याच मतांच्या विश्वासावर रविकांत तुपकर हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. 

 येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. याच अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group