रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले गरोदर महिला आणि बाळाचे प्राण
रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले गरोदर महिला आणि बाळाचे प्राण
img
Dipali Ghadwaje
इगतपुरी : इगतपुरी रेल्वे स्टेशन येथून बुधवारी दुरांतो एक्सप्रेसमध्ये एका  गरोदर महिलेला अचानक असह्य  वेदना होऊ लागल्या , याबाबत माहिती समजताच इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापुसाहेब गुहिल, सुजाता निचड, निकिता काळे यांनी माणुसकी दाखवली.

यामुळे सुदेशना चेतन साबळे वय ३० वर्ष रा. प्लॉट नं २३ ए. कैलास नगर एसएसडी बंगलो अर्जुननगर जि. अमरावती या महिलेला अत्यावश्यक वैद्यकीय सहाय्य मिळाले. समयसूचकतेने योग्य वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने ह्या महिलेला जीवदान मिळाले आहे.

प्रसूतीनंतर महिला आणि तिचे गोंडस बाळ सुखरूप असून साबळे यांच्या कुटुंबाने इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलिसांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

नेमकं काय घडले?

सुदेशना साबळे ह्या आपल्या पतीसोबत प्रवास करत असतांना त्यांना अचानक प्रसुतीपुर्व वेदना होवु लागल्याने त्यांना रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी महत्वाची मदत केली. त्यांना उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्याने त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात तातडीने पाठवण्यात आले. डॉक्टरांनी वेळ वाया न घालवता ह्या महिलेची प्रसूती सुखरुप केली. महिला व बाळाची तब्बेत चांगली आहे. वेळेत सहकार्य मिळाले नसते तर दोन जीवांना धोका निर्माण झाला असता असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान साबळे यांच्या परिवारासह इगतपुरीच्या नागरिकांनी इगतपुरी रेल्वे पोलीसांच्या कामाचे कौतुक केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group