नाशिक : माजी नगरसेवक उत्तमराव कांबळे (वय ८२) यांचे निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मनपा स्थायी समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषवले होते. नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची कामे केली. तिबेटीयन मार्केट उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जनलक्ष्मी बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. भूतपूर्व नाशिक नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी पद भूषवले.
2017 पर्यंत काँग्रेसचे सलग नगरसेवक म्हणून ते कॅनडा कॉर्नर भागातून निवडून येत होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी 2017 मध्ये त्यांचे चिरंजीव समीर कांबळे यांना राजकारणात उतरवले होते.
त्यांनी नगरसेवक असताना मिशनमळा, शरणपूर, सहजीवन काॅलनी, तिडके काॅलनी भागात विविध साेयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या हाेत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सून,नातवंडे असा परिवार आहे.