देश हादरला! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार जात होती पण...
देश हादरला! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार जात होती पण...
img
Dipali Ghadwaje
उज्जैन, मध्य प्रदेश : धर्माची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. उजैनमध्ये आई-लेकीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे.  १२ वर्षाच्या मुलीने या बलात्कारांच्या तावडीतून सुटका करत पळ काढला.  उज्जैनमधील घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार झाल्यानंतर पीडित बालिका जवळपास अडीच तास रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार अर्धनग्नावस्थेत फिरत होती. पीडिता मदत मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 

या धक्कादायक घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन शर्मा म्हणाले, "सोमवारी उज्जैनच्या महाकाल पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर सुमारे 12 वर्षांची एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली आहे. 

पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले की,  " पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशातील असावी. तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही. पोलिसांना तिचे नाव आणि पत्ता नीट सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अल्पवयीनाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मंगळवारी इंदूरला नेण्यात आले. याप्रकरणी महाकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिताही गतीमंद असल्याचा अंदाज आहे. एका आश्रमाजवळ अर्धनग्न रक्तबंबाळ अवस्थेत ती फिरत आली. त्यानंतर एका पुजाऱ्याने तिला टॉवेलमध्ये गुंडाळले आणि रुग्णालयात दाखल केले. घटना नेमकी कुठं घडली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर असलेल्या बडनगर रस्त्यावर सीसीटीव्हीमध्ये पीडित अल्पवयीन फिरत असल्याचे दिसून आले. 

पीडितेला आर्थिक मदत देण्याची मागणी
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पीडितेला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. "उज्जैनमध्ये एका लहान मुलीवर झालेला अत्यंत क्रूर बलात्कार प्रकरण पाहून हृदय हेलावले आहे.  मध्य प्रदेशात कायद्याचे राज्य संपले आहे आणि जनता चिंतेत असताना गुन्हेगार मोकळे फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group