नाशिक : रस्ते आणि पूल निर्माण क्षेत्रांत देशभर लौकिक राखून राहिलेल्या येथील अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीने पुरस्कार मालिकेत आणखी एका मानाच्या पुरस्काराची नोंद केली आहे. माध्यम क्षेत्रातील ख्यातकीर्त टाईम्स समूहाच्या वतीने पायाभूत सुविधा क्षेत्रातील ‘सर्वात प्रशंसनीय कंपनी’ (Most Admired Company) हा प्रतिष्ठित मुकुट अशोकाच्या शिरपेचात खोवण्यात आला आहे.
नवी दिल्लीत झालेल्या एका शानदार सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख आणि संचालक आशिष कटारिया यांनी संयुक्तरीत्या हा पुरस्कार स्वीकारला.
पायाभूत सुविधा क्षेत्रात अशोका बिल्डकॉन लिमिटेडने केवळ देशांतर्गतच नव्हे तर विदेशातही आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.