नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- सिन्नर फाटा, चेहडी शिव येथील युवकावर जुन्या भांडणाची कुरापत काढून काही युवकांनी रॉडने हल्ला केला. डोक्यावर गंभीर घाव लागल्याने जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिन्नर फाटा जवळील यश टायर सेंटर समोरून आज संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रमोद रामदास वाघ (वय 40) हा युवक आपल्या दुचाकी वरून सर्व्हिस रोड ने सिन्नर फाटा कडे येत असतांना योगेश पगारे व त्याच्या काही साथीदारांनी त्यास अडवले.
त्याच्या सोबत जुन्या भांडणावरून वाद घालत असताना यातील एका युवकाने प्रमोद वाघ याच्या डोक्यात रॉड मारला व इतर साथीदारांनी त्यास मारहाण करून जबर जखमी केले.
त्यास नाशिकरोड मधील जयराम हॉस्पिटल मध्ये उपचार्थ दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेतली.
संशयिताच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.