मोठी बातमी ! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत  निवडणूक आयोगाकडून महत्वाची अपडेट
मोठी बातमी ! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून महत्वाची अपडेट
img
दैनिक भ्रमर
लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. जवळपास 10 वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर हरियाणामध्ये फक्त एका टप्प्यामध्येच निवडणूक होईल. हरियाणाच्या सगळ्या जागांवर 1 ऑक्टोबरला मतदान होईल. जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

दरम्यान , जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतही मोठी घोषणा केली आहे. ‘2019 साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकत्र निवडणुका झाल्या होत्या. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपतोय, तर हरियाणाचा 3 नोव्हेंबरला, त्यावेळी जम्मू काश्मीरचा विषय नव्हता. यावेळी 4 निवडणुका एका वर्षात घ्यायच्या आहेत’, आम्ही 2-2 राज्यांच्या निवडणुकासोबत घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळं अनेक गोष्टी बाकी आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सण-उत्सव आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करूयात," असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. असं केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group